पुणे मेट्रो बद्दल

महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व ऐतिहासिक राजधानी पुणे, ज्याला त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यामुळे आणि समृद्ध नैसर्गिक संसाधनामुळे दख्खनची राणी म्हणून ओळखले जाते.

संत तुकाराम यांचे जन्मस्थान,‘ हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करणारे महान योद्धा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी, समाजसुधारक ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीची मशाल चेतविणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांची कर्मभूमी.

पुणे शहर जगाच्या नकाशावर तिच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकास संस्था, आय.टी. पार्कस्‌ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगांमुळे ओळखले जाते.

गेल्या काही दशकांत शहराची लोकसंख्या वाढली. देशाच्या विविध भागांतील लोकं रोजगाराच्या संधीमुळे पुण्यात स्थलांतरित झाले. परंतु, नागरिकांना मिळणाऱ्या निरंतर आणि शाश्वत पायाभूत सुविधांचा या शहरात अभाव होता. पुण्यातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवासात जाणारा सरासरी वेळ हा १०० मिनिटांच्या वर आहे. या कारणामुळे अधिकाधिक नागरिक स्वत:च्या वाहनांचा उपयोग करू लागले. यामुळे शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. अपघाताचे प्रमाण वाढले.

आता येथे, पुणे मेट्रो या प्रश्नावर तोडगा काढण्यास मदत करेल. पुणे मेट्रो आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास देऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ ७५ टक्क्याने कमी करेल. शहरातील युवा, विद्यार्थी, व्यवसायी आणि नोकरदार आदींसाठी त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देईल. मेट्रो रेल्वे भविष्यात स्मार्ट सिटी प्रकल्पातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या पाठीचा कणा बनेल आणि प्रकल्पातील विविध मापदंडांना बळकट करेल :

मापदंड

परिस्थिती

 

विद्यमान स्थिती

मेट्रोसह

वाहतूक कोंडी कामाच्या वेळी बहुतांश रस्त्यावर वाहतुकीची कोंडी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी प्रवाशांना मेट्रोकडे वळविण्यात येईल.
प्रदूषण शहरातील हवेची गुणवत्ता खाली जात आहे.
स्त्रोत : वायु गुणवत्ता : पुणे येथे वातावरणातील हवा गुणवत्तेचे परीक्षण करण्यात आले.
रस्त्यावरील वाहनांची संख्या जशी कमी होईल तसे हवेच्या गुणवत्तेत सुधार होईल.
रस्ते अपघात रस्त्यावरील वाहनांच्या अधिक संख्येमुळे अपघाताची संख्या वाढली रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होताच अपघातांच्या संख्येतही घट होईल.
सोय खराब रस्ते, वाहतुकीची कोंडी, इत्यादिन मुले गैरसोय अधिक आरामदायक, विश्वसनीय व वेळेवर असल्यामुळे प्रवास्यांच्या सोयीची .
हवामान तीव्रता वैयक्तिक वाहनांच्या चालकांना प्रभावित करीत आहे. अडथळारहित आणि आरामदायी हालचाल.
प्रवासाची वेळ वाहतुकीची कोंडी आणि सिग्नलमुळे प्रवास वेळेत वाढ प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांपर्यंत कमी करेल.
किंमत वाहतूक कोंडीमुळे इंधनाची खपत अधिक, प्रवासाचा वेळ अधिक आणि इंधनाच्या उच्च किंमतीमुळे खर्च अधिक. वैयक्तिक वाहन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी खर्च.
इंधन बचत जीवाश्म इंधन वापरामुळे अधिक ऊर्जेचा वापर रस्ता वाहतुकीच्या तुलनेत केवळ १/५ ऊर्जेचा वापर.

म्हणूनच पुणे मेट्रो क्षेत्रासाठी एक सुरक्षित, विश्वसनीय, कार्यक्षम, परवडणारे, प्रवाशांसाठी मैत्रीपूर्ण आणि पर्यावरणाचे संवर्धन करणारी जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे.