Pune Metro Rail project, Metro train company to build the metro project by 2021

जगभरात पुणे मेट्रोची छाप उमटविण्यासाठी तसेच पुणे शहर आणि मेट्रो यांच्यातील नाते कळावे यासोबतच संस्थेचे तत्त्वज्ञान, मूल्य आणि उद्दिष्ट झळकावे, हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पुणे मेट्रोच्या प्रभावी अश्या लोगोची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत येणा-या या प्रकल्पाचे प्रातिनिधीक स्वरुपात नाविण्यापूर्ण लोगोची निर्मिती करण्यात आली आहे.

  • लोगो मधील वर्तुळ सुरक्षेचे प्रतीक आहे आणि मेट्रोचे काम हे सुरक्षित हातात असल्याचे द्योतक आहे.
  • लोगोच्या तळाशी असलेले दोन रेषा हे उंच आणि भूमिगत रेल्वे रूळाला दर्शविते. असे मार्ग पुणे मेट्रोच्या प्रवासासाठी तयार होत आहेत.
  • - लोगोच्या वर असलेले शब्द ‘महा मेट्रो’ म्हणजे ‘ग्रेट मेट्रो’ असे दर्शवितात. महाराष्ट्रातील संपूर्ण मेट्रो रेल प्रकल्पातील सारखेपणा दर्शवितो जो महाराष्ट्रातील जनतेला, ज्येष्ठ नागरिकांना, आगंतुकांना, पर्यटकांना, बालकांना आणि विद्यार्थ्यांना समर्पित केला आहे.

 

पुणे मेट्रोच्या लोगोमध्ये असलेले रंग हे शहराच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात

  • नारंगी (orange) रंग शहराची संस्कृती, आनंदी वातावरण दर्शवितो.
  • निळा (Blue) रंग हा शहराला वेढले असलेले पाणी आणि पुणे शहरातील सरळ सोपी जीवनशैली दर्शवितो.
  • पुणे शहरातील हिरवळ आणि शहराला वेढलेले जंगल लोगोमधील हिरवा (Green) रंग दर्शवितो.
  • जांभळा (Purple) रंग चांगले कार्य करण्यासाठी असलेला सकारात्मक दृष्टीकोन दर्शवितो.

अर्थातच, पुणे मेट्रोचा साधा आणि सोपा लोगो हा पुणे शहर आणि शहरातील नागरिकांना देण्यात येत असलेली उत्कृष्ट सेवा दर्शवितो.